नंदुरबार- शहरात 48 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्यावतीने रुग्णाच्या निवासस्थान परिसर पूर्णपणे बॅरिकॅडींग करून सील करण्यात आले आहे.
नंदुरबारात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला; शहरात तीन दिवस संचारबंदी - nandurbar corona news
नंदुरबार शहरात संचारबंदीचे कठोरपणे पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता घरातच राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अनावश्यक बाहेर फिरताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी म्हटले.
नंदुरबार जिल्हा दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात असून प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेतली जात असल्यामुळे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश होता. मात्र, शहरातील 48 वर्षीय रुग्णाचा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. हा रुग्ण वॉर्ड क्रमांक 10 भागातील आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून रुग्णाच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच त्याच्या 1 ते 2 किलोमीटर परिसरात कोणत्याही वाहनास अनुमती नसेल, तसेच कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. तसेच रुग्णाच्या परिवारातील सदस्यांना देखील जिल्हा रुग्णालयात खबरदारी म्हणून दाखल करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून कोरोना बाधित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन संपर्कातील लोकांचा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून शोध घेतला जात आहे. तसेच कोरोना बाधित रुग्णाच्या निवासस्थान परिसरात प्रशासनाच्यावतीने फवारणी करण्यात येत आहे. नंदुरबार शहरात संचारबंदीचे कठोरपणे पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता घरातच राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अनावश्यक बाहेर फिरतांना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.