नंदुरबार - शहादा येथील संसर्ग झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. हा जिल्ह्यातील पहिलाच मृत्यू आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. याव्यतिरिक्त अन्य सहा जणांवर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या शहाद्यातील युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. शहादा येथील 32 वर्षाच्या व्यक्तीला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याची स्वॅब टेस्ट करण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने संबंधिताला आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले.
शहरात 17 एप्रिलला पहिल्यांदा कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. यानंतर त्याच्या नातेवाईकांना व संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यापैकी बाधित रुग्णाच्या कुटुंबातील तिघांना संसर्ग झाल्यामुळे जिल्ह्यातील आकडा चार वर गेला होता. यानंतर शहाद्यात 32 वर्षाचा तरुण व 42 वर्षााची महिला या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. अक्कलकुवा येथील एका महिलेला संसर्ग झाल्याचा अहवाल आला.
शहादा येथील 32 वर्षीय युवकाला श्वसनाच्या खूप जास्त त्रास होत असल्याने त्याची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.