नंदुरबार -महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या लक्कडकोट येथे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास गुजरात राज्यातून एक गाडीतून काळ्या रंगाचे जॅकेट डोक्यावर टोपी घालून दोन व्यक्ती येतात. पार्सल आहे का, असा प्रश्न विचारतात. अचानक गोळीबार होतो. यात प्रवीण गावित या व्यक्तीला किरकोळ जखम झाली. मात्र संबंधित दोघे लगेच तेथून पळून जातात, अशी माहिती प्रवीण गावित या व्यक्तीने दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
अज्ञातांकडून गोळीबार
महाराष्ट्र व गुजरात सीमेवर असलेल्या लक्कडकोट येथे एका व्यावसायिकावर अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या व्यक्तीने गोळीबार केला. यात प्रवीण नामक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. मात्र गोळीबार करण्याचे कारण समजू शकले नाही.