महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विसरवाडीत बनावट ऑईल कारखान्याला भीषण आग, ५ घरे जळून खाक - visarwadi fire incident

आग विझवण्यासाठी नागरिकांनी नवापूर, नंदुरबार येथील अग्निशामक दलाला पाचारण केले होते. मात्र, आगीवर अद्याप नियंत्रण मिळालेला नाही. घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह सह कर्मचाऱ्यांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आगीचे दृश्य
आगीचे दृश्य

By

Published : Sep 17, 2020, 4:10 PM IST

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील न्हावी गल्ली परिसरातील एका घराला भीषण आग लागली आहे. या घरात बनावट ऑईल बनवण्याचा कारखाना होता. या घटनेत ५ घरे जळून खाक झाली आहेत. आगीचे रौद्ररूप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेचे दृश्य

आग विझवण्यासाठी नागरिकांनी नवापूर, नंदुरबार येथील अग्निशामक दलाला पाचारण केले होते. मात्र, आगीवर अद्याप नियंत्रण मिळालेला नाही. घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह सह कर्मचाऱ्यांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्याबरोबर विसरवाडी येथील सरपंच बकाराम गावित यांच्यासह नागरिक देखील मदत कार्याला हातभार लावत आहेत. दर गुरुवारी आठवडी बाजार भरत असल्याने आज विसरवाडीत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. अचानक लागलेल्या आगीमुळे आठवडी बाजारात नागरिकांनी एकच धावपळ केली.

हेही वाचा-पतंग उडवण्यावरुन वाद : दोन गटात सशस्त्र हाणामारी; एकाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details