महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसाने उघडीप दिल्यानंतर अंतर मशागतीच्या कामांना वेग, पिकांवर रोगराई वाढली - Farm work in nandurbar

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची मशागतीचे कामे करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्याच बरोबर संततधार पावसामुळे पिकांवर अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पिकांवर किटकनाशक फवारणीची आवश्यकता होती.

पावसाने उघडीप दिल्यानंतर अंतर मशागतीच्या कामांना वेग, पिकांवर रोगराई वाढली
पावसाने उघडीप दिल्यानंतर अंतर मशागतीच्या कामांना वेग, पिकांवर रोगराई वाढली

By

Published : Aug 23, 2020, 1:34 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने ग्रामीण भागात शेती कामांना वेग आला आहे. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे मूग, कापूस आणि ज्वारी पिकांवर आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हातचे पीक वाया जाऊ नये म्हणून जिल्ह्यात सर्वत्र फवारणी आणि अंतर मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीची कामे करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्याच बरोबर संततधार पावसामुळे पिकांवर अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पिकांना किटकनाशक फवारणीची आवश्यकता होती. मात्र, पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे फवारणी करणे शक्य होत नव्हते. परिणामी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच बरोबर पिकांना योग्य तो सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे, त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे .

आता पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. तरीही सध्या शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम मशागतीच्या कामांवर होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details