महाराष्ट्र

maharashtra

प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकरी उदासीन

By

Published : Dec 3, 2019, 9:22 PM IST

यंदा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांची उत्पादन क्षमता ठरविण्यासाठी कृषी विभागाच्या मार्फत जिल्ह्यातील 36 मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात सुरू आहेत. पीक कापणी प्रयोग अंतर्गत जिल्ह्यातील पिकांची उत्पादन क्षमता ठरवली जाणार आहे.

Farmers indifferent to PMs crop insurance scheme
प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकरी उदासीन

नंदुरबार- जिल्ह्यात गेल्या 5 वर्षांपासून प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या योजनेसंदर्भात उदासीनता आहे. तर यंदा 9 हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान विमा योजनेंतर्गत विमा उतरवला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकरी उदासीन

हेही वाचा -नंदुरबारमध्ये घरफोडी करणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र प्रसारित; दोन दिवसात सव्वा दोन लाखांची घरफोडी

यंदा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांची उत्पादन क्षमता ठरविण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील 36 मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात सुरू आहेत. पीक कापणी प्रयोग अंतर्गत जिल्ह्यातील पिकांची उत्पादन क्षमता ठरवली जाणार आहे. त्यामध्ये नुकसान झालेले असल्यास शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे.

हेही वाचा - एचआयव्ही बाधितांचा विवाह सोहळा, शहादा पोलिसांचा उपक्रम

जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगाची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येत आहे. एकूणच या वर्षी अतिवृष्टी आणि वातावरणातील बदल यामुळे उत्पादन क्षमतेवर किती परिणाम झाला आणि त्यातून किती नुकसान झाले? हे ठरवण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details