नंदुरबार - लॉकडाऊनचा मोठा फटका नंदुरबार जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे. नंदुरबार येथील भाजीपाला बाजार बंद असल्याने शेतकरी शहादा येथील बाजार समितीत भाजीपाला विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, या ठिकाणी खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी मोकाट गुरांना आपला भाजीपाला टाकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असून भाजीपाला पिकवण्यासाठी व तो बाजारात आणण्यासाठी लागलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जाच्या डोंगरासमोर उभा आहे.
कोरोना इफेक्ट: भाजीपाला बाजारात व्यापारी नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ - news about corona
लॉकडाऊनचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. भाजीपाल बाजार बंद असल्याने शेतकरी शहादा बाजार समितीत भाजीपाल विक्रीसाठी आणत आहे. मात्र, या ठिकाणी व्यापारी येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जाते. मात्र, संचारबंदी नंतर नंदुरबार येथील भाजीपाला बाजार बंद असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला शहादा बाजार समितीच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात आहेत. मात्र, या ठिकाणी खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला तसाच पडून राहत आहे. यामुळे शेतकऱ्याला आपला माल तसाच बाजार समितीत सोडून परत जावे लागत आहे. शेतकरी हा भाजीपाला मोकाट गुरांना टाकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बाजार समितीत भाजीपाला आण्याचा खर्च निघत नसल्याने शेतकरी भाजीपाला शहादा बाजार समितीत आणत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ बसत आहे.