नंदुरबार - जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शुक्रवारी झालेल्या पावसाने तालुक्यातील बहुतांश भाजीपाला आणि भातपीक जमीनदोस्त झाला आहे. यामुळे या परिसरातील आदिवासी शेतकरी संकटात सापडला आहे.
नवापूर तालुक्यातील पिकाच्या नुकसानाची दृष्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. धरणातून सोडलेले पाणी शेतात शिरल्यामुळे शेतीचे नुकसान झाले असून संततधार पावसामुळे तरकारी पिके सडू लागली आहेत. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी
मागणी यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -गांधी १५० : देहराडूनमधील स्वातंत्र्याची साक्ष देणारे पिंपळाचे झाड
पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वाधीक प्रमाण नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांमध्ये पाणी साचल्याने कोबी, फुलगोबी, मिरची, टमाटर, मेथी, कोथिंबीर आदी पिके सडू लागली आहेत. तसेच, किडीचा उपद्रव वाढला आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. मात्र, आता या जास्तीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेकडो शेतकरी चिंतातूर झाले आहेत. दरम्यान, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा -10 कार्यक्रम, पुरस्कार अन् बहुपक्षीय चर्चा; पंतप्रधान मोदी अमेरीका दौऱ्यासाठी रवाना