महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा... शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट - कृषी विभाग

दुष्काळी परिस्थितीतही बियाणे आणि खतांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे.

शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट

By

Published : Jul 2, 2019, 8:32 PM IST

नंदुरबार - संपूर्ण पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. जून महिना संपला मात्र तरीही नंदुरबार जिल्ह्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पेरण्या उरकल्या आहेत. आता त्यांना दुबार पेरणी करण्याचे संकट भेडसावत आहे.

नंदुरबार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

दुष्काळी परिस्थितीतही बियाणे आणि खतांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. आता पावसाचा एक महिना उलटला आहे. उरलेल्या तीन महिन्यांच्या पावसासाठी कोणते पीक पेरावे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. बियाणे आणि खतांच्या खरेदीत घट झाली आहे. शासनाद्वारे होणाऱ्या बियांचा आणि खतांचा पुरवठा गरजेनुसार होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाद्वारे देण्यात आली आहे.

2018 मधील नंदुरबार जिल्ह्यातील पर्जन्यमान २ जुलै पर्यंत 693:00 मिमी, सरासरी 115:50 मिमी एवढा पाऊस झाला होता. 2019 मध्ये स्थिती खूप वेगळी आहे. यावर्षी २ जुलै पर्यंत 385:00 मिमी, सरासरी 64:17 मिमी एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीकामाला पाहिजे तशी सुरुवात झालेली नाही. म्हणून शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details