महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत; खरीप हंगामात 58 टक्के पेरण्या पूर्ण - कडधान्ये

जिल्ह्यातील प्रमुख पिकांमधील कापसाचे क्षेत्र एकूण १ लाख ६ हजार ९० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ७७ हजार ८०७ हेक्‍टरवर आतापर्यंत कापूस लागवड पूर्ण झाली आहे.

पावसाच्या प्रतिक्षेत 58 टक्के पेरण्या पू्र्ण

By

Published : Jul 12, 2019, 3:24 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात जून महिन्यामध्ये अपेक्षेसारखा पाऊस झाला नाही. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. मात्र, अजून पेरणी लायक समाधानकारक पाऊस झालेला नाही. तरीही झालेल्या पावसावर बळीराजाने ५८ टक्के पेरण्या उरकल्या असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

नंदुरबार पावसाच्या प्रतीक्षेत...! खरीप हंगामात 58 टक्के पेरण्या पूर्ण

जिल्ह्यातील प्रमुख पिकांमधील कापसाचे क्षेत्र एकूण १ लाख ६ हजार ९० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ७७ हजार ८०७ हेक्‍टरवर आतापर्यंत कापूस लागवड पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात अक्कलकुवा, धडगाव आणि नवापूर या तालुक्यांमध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने ज्वारीचे पीक घेतले जाते. जिल्ह्यात ज्वारी पिकाचे एकूण क्षेत्र ३० हजार १२६ हेक्टर आहे. त्यापैकी १७ हजार ४२८ हेक्टरवर ज्वारी पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३१ हजार ९२८ हेक्टर आहे. त्यापैकी १८ हजार १९३ हेक्‍टरवर मक्याची लागवड पूर्ण झाली आहे.

शेतकऱ्यांचा कल नगदी पिके घेण्याकडे वाढत आहेत. मात्र, यामुळे अन्नधान्याच्या पिकांमध्ये घट होत आहे. जिल्ह्यातील बाजरी हे प्रमुख पीक होते. मात्र, दिवसेंदिवस बाजरी पिकाचे क्षेत्र कमी होत चालले आहे. तसेच उडीद, मूग, तूर, भुईमूग, भात या पिकांचेही क्षेत्र कमी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. बाजरी पिकाला केंद्र शासनाने न्यूट्रिशनमध्ये समाविष्ट केल्याने तृणधान्ये आणि कडधान्ये यांवर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे आव्हान कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पेरणीसाठी समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. सरासरीपेक्षा फक्त १९ टक्केच पाऊस आतापर्यंत झाला आहे. मात्र, तरीही बळीराजाने कमी पावसाच्या भरवशावर पेरण्या उरकल्या आहेत. कमी दिवसात आणि कमी पाण्यात उत्पन्न देणाऱ्या पिकांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details