नंदुरबार - जिल्ह्यात 3 हजार 365 हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात मिरची पिकांवर विषाणूजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
नंदुरबारमध्ये मिरचीवर करप्या रोग, शेतकरी संकटात
शेतकऱ्यांनी एक ते दीड रुपये प्रतिरोप याप्रमाणे या रोपांची खरेदी केली. त्याला एकरी ५० हजार रुपये खर्च देखील आला. आता यामधून तीन ते चार लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने मिरची पीक नाहीसे झाले आहे. त्यामुळे आता इतका खर्च कसा भरून काढायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली जाते. मात्र, दरवर्षी कुठलातरी रोग येऊन मिरचीचे नुकसान होते. यंदाही मिरचीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गेल्या आठ दिवसांपासून रिपरिप सुरू असलेल्या पावसामुळे मिरचीवर कुठल्याही प्रकारची फवारणी करत येत नाही. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मिरची उपटून टाकण्याशिवाय पर्याय उरला नाही.