नंदुरबार- पावसाळा सुरू होऊनही पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बोअरवेल, विहिरी आटल्याने नागरिकांनाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी नवापूर तालुक्यातील भरडू गावातील शेतकरी जमिनीखाली पाण्याचा शोध घेत आहेत. मात्र तरीही पाणी पातळी खोल गेल्याने बोअरवेलला पाणी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे.
दुष्काळाच्या झळा; शेतकरी घेत आहेत जमिनीखालील पाण्याचा शोध - बोअरवेल
दुष्काळामुळे जिल्ह्यात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी जमिनीखाली पाणी शोधत आहेत.
पाण्याचा शोध घेताना शेतकरी
वरुणराजाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी जमिनीखाली असलेल्या पाण्याचा शोध सुरु केला आहे. परंतु जमिनीखाली असलेल्या पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणी शोधण्यात मोठी अडचण होत आहे. पाचशे फुटाच्या नंतरच पाणी लागेल, अशी माहिती पाण्याचा शोध घेणाऱ्यांनी दिली आहे.