महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - नंदुरबार लेटेस्ट न्यूज

नंदुरबार येथे एका शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. कैलास पंडीत पाटील (५८), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

nandurbar farmer suicide news  nandurbar suicide news  nandurbar latest news  नंदुरबार लेटेस्ट न्यूज  नंदुरबार शेतकरी आत्महत्या
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jul 10, 2020, 12:33 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील शनिमांडळ येथील एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. लॉकडाऊनंतरच्या काळातील जिल्ह्यामधील ही पहिलीच आत्महत्येची घटना आहे.

कैलास पंडीत पाटील (५८), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते शनिमांडळ येथील रहिवासी असून त्यांच्याकडे अल्प शेती होती. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, त्यांच्यावर काही कर्ज असल्याने ते सतत चिंतेत राहायचे. त्याच कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी शनिमांडळ शिवारातील शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत गोपीचंद कैलास पाटील यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details