महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमधील 12 लाख प्राधान्य योजनेतील कुटुंबांना मिळणार धान्य वितरण आणि गॅस जोडणी - pradhanya yojna Food Distribution Nandurbar

जिल्ह्यातील १२ लाख प्राधान्य योजनेतील कुटुंबांना धान्य वितरण आणि गॅस जोडणी दिली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणारा सर्व्हे पूर्ण झाला आहे. ग्रामीण भागातील प्राधान्य कुटुंबांना मिळालेली ही दिवाळी भेटच म्हणता येईल.

प्राधान्य योजना

By

Published : Oct 28, 2019, 12:27 PM IST

नंदुरबार- जिल्ह्यातील १२ लाख प्राधान्य योजनेतील कुटुंबांना धान्य वितरण आणि गॅस जोडणी दिली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणारा सर्व्हे पूर्ण झाला आहे. ग्रामीण भागातील प्राधान्य कुटुंबांना मिळालेली ही दिवाळी भेटच म्हणता येईल.

12 लाख प्राधान्य योजनेतील कुटुंबांना मिळणार धान्य वितरण आणि गॅस जोडणी

योजने अंतर्गत पात्र रेशनकार्ड धारकांना केवळ शंभर रुपये भरून गॅस जोडणी दिली जाणार असून त्याचा खर्च शासन करणार आहे. यात अंत्योदय योजनेचा इष्टांक एक १ ६ हजार ६९८ असून कार्ड प्रधान्य योजनेतील ७ लाख युनिट, अशा १२ लाख कार्ड धारकांना अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे.

ग्रामीण भागात वार्षिक उत्पन्न ४४ हजार तर शहरी भागात ५९ हजार उत्पन्न असलेल्या व सध्या धान्य मिळत नसलेल्या एनपीएस योजनेतील केशरी कार्डधारकांकडून हमीपत्र भरून घेणे. तसेच, कार्ड धान्य योजनेत आलेले हमिपत्र तपासून समाविष्ट करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती, जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा-खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! अक्कलकुवाच्या पोलिसांनी मनोरुग्णासोबत साजरी केली दिवाळी

ABOUT THE AUTHOR

...view details