महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सारंगखेडा घोडे बाजारात महागडे घोडे दाखल, करोडपती 'राधा'ने वेधले लक्ष - Sarangkheda Horse Festival

Sarangkheda Horse Festival : देशातील सर्वांत मोठ्या घोडेबाजारांपैकी एक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रा उत्सवात महागडे घोडे दाखल झाले आहेत. (mare named Radha) या यात्रोत्सवात सुमारे 3000 घोडे दाखल झाले असून अजून काही घोडे दाखल होण्याची शक्यता आयोजकांकडून वर्तवण्यात आली आहे. या यात्रेतील पहिल्याच दिवशी उत्तर प्रदेशातील बरेली येथील 'राधा' नामक घोडीने यात्रेकरूंचे लक्ष वेधले आहे. मालकाने या घोडीची किंमत एक कोटी रुपये एवढी ठेवली आहे.

Sarangkheda Horse Festival
राधा घोडी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 7:40 PM IST

अश्व उत्सवाविषयी माहिती देताना आयोजनाचे अध्यक्ष

नंदुरबारSarangkheda Horse Festival : सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेल्या उत्तर प्रदेशातील बरेली येथील 'राधा' घोडीची चर्चा आहे. तिची अदा, सौंदर्य, चाल आणि रुबाबाने यात्रेकरूंचे लक्ष वेधले आहे. तिची किंमत १० लाख नाही १५ लाख नाही तर तब्बल १ कोटी रुपये आहे. आता पर्यंत ७० लाखांपर्यंत तिची बोली लागली आहे. मात्र, मालक नजीमभाई यांना ही घोडी विक्री करायची नाही. कारण ती जातिवंत असल्याने ते त्यांच्या अश्वशाळेत अश्वपैदास करण्यासाठी तिचा वापर केला जातो. त्यातून मिळणारे उत्पन्न जास्त असल्याचे ते सांगतात. (horse market at Sarangkheda)

यात्रेत 'राधा' घोडीने वेधले लक्ष :या घोडीची उंची ७२ इंच इतकी आहे. देशात होणाऱ्या अश्व स्पर्धांमध्ये 'राधा' सहभाग घेऊन मालकाचा सन्मान वाढवत आहे. तिने अनेक पारितोषिकं जिंकली आहेत. देशातील सर्वांत उंच घोडी असल्याचा दावा मालकाने केला आहे. ही मारवाड जातीची असून पांढरी शुभ्र आहे. तिच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जात असते. तिला दिवसाला ७ लिटर दूध तसंच मका, राईचे तेल, बदाम, गावरान अंडी दिली जातात. तिची देखभाल करण्यासाटी ३ जण तैनात असतात. घोड्याची उंची आणि त्याच्या सौंदर्यावर, त्याच्या जातीवरून त्याची किंमत ठरत असते. या वर्षी घोडे बाजारात अनेक किमती घोडे दाखल होण्यास सुरुवात झालीय. यात्रेत चार राज्यातून घोडे स्पर्धेसाठी दाखल होणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंग रावल यांनी दिली आहे.

सुमारे तीन हजार घोडे यात्रेत दाखल :सारंगखेडा यात्रा अश्वांसाठी प्रसिद्ध असल्याने देशभरातून अश्व प्रेमी आणि व्यापारी सारंगखेडा येथे दाखल होत असतात. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे 3000 जातीवंत घोडे दाखल झाले आहेत. या यात्रोत्सवात विविध प्रजातींचे घोडे दाखल होत असतात. त्याचबरोबर अश्व स्पर्धेत देखील सहभागी होण्यासाठी नामवंत घोडे व्यापारी व अश्वशौकीन स्पर्धेत भाग घेत असतात.

हेही वाचा:

  1. सुनिल केदार यांना मोठा धक्का; जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी पाच वर्षाची शिक्षा
  2. मुंबईची लूट दिल्लीश्वरांच्या आदेशाने, आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका
  3. सुधाकर बडगुजर यांची अटक टळली, एसीबीकडून आठ दिवसांची मुदत

ABOUT THE AUTHOR

...view details