महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 8, 2020, 4:46 PM IST

Updated : Apr 8, 2020, 6:10 PM IST

ETV Bharat / state

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने दिले पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी निवृत्तीवेतन

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गोपाळ बडगुजर यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे आपण आपल्या विविध मागण्यांसाठी नेहमी प्रशासनाशी भांडत असतो त्याप्रमाणे राज्य आणि देशावर आलेल्या संकटसमयी देखील माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

pm care fund
सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने दिले पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी निवृत्तीवेतन

नंदुरबार -शहरातील वीर सावरकर नगरातील रहिवासी तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपाळ मखन बडगुजर यांनी कोरोनाबाधीतांसाठी आपले मार्च महिन्यातील संपूर्ण निवृत्तीवेतन (२१ हजार ९८६ रुपये) पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले. तसा धनादेश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द केला.

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने दिले पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी निवृत्तीवेतन

मंगळवारी सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ मखन बडगुजर यांनी आपल्या पत्नी प्रतिभा गोपाळ बडगुजर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर कोरोना संदर्भात प्रशासनाला मदत करण्याचे निश्चित केले. त्यानुसार सदर मदतीचा धनादेश थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवीण्याचा मानस बडगुजर दाम्पत्यांनी व्यक्त केला. त्यानुसार मार्च महिन्याचे पेन्शन २१ हजार ९८६ रुपये इतका धनादेश तयार करून गोपाळ बडगुजर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ बडगुजर यांचे आभार मानले. त्यानंतर बोलताना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गोपाळ बडगुजर यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे आपण आपल्या विविध मागण्यांसाठी नेहमी प्रशासनाशी भांडत असतो त्याप्रमाणे राज्य आणि देशावर आलेल्या संकटसमयी देखील माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. सद्यपरिस्थितीत कोरोनामुळे देशावर मोठे संकट आले आहे. अशा प्रसंगी भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या परीने यथाशक्तीनुसार मदत करण्याची आवश्यकता आहे. विविध संस्थांप्रमाणे सेवानिवृत्त बांधवांनी देखील आपल्या आयुष्यातील अल्पशी मदत प्रशासनाला देऊन खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ बडगुजर यांनी केले आहे.

Last Updated : Apr 8, 2020, 6:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details