महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Liquor Seized : गुजरात निवडणूक, नवापुरात आतापर्यंत 70 लाखांची दारू जप्त - गुजरात राज्यात निवडणूक

गुजरात निवडणुकीत (Elections in Gujarat state) महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी (Liquor Smuggling from Maharashtra to Gujarat) होत आहे. गुजरात राज्यात दारूबंदी (Liquor Prohibition in Gujarat State) आहे. महाराष्ट्रातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात 70 लाख पर्यंतची दारू पोलिसांनी जप्त (Liquor Seized In Nawapur) केली. latest news from Nandurbar, Nandurbar Crime. गेल्या पंधरा दिवसांपासून सीमा वरती भागात मोठ्या प्रमाणावर नाकेबंदी करण्यात आली होती. यात वेगवेगळ्या कारवायात आतापर्यंत सत्तर लाखांची दारू पकडली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी दिली आहे.

Liquor Seized
70 लाखांची दारू जप्त

By

Published : Nov 25, 2022, 4:12 PM IST

नंदुरबार :गुजरात राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत (Elections in Gujarat state) महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी (Liquor Smuggling from Maharashtra to Gujarat) होत आहे. गुजरात राज्यात दारूबंदी (Liquor Prohibition in Gujarat State) असल्यामुळे महाराष्ट्रातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात 70 लाख पर्यंतची दारू पोलिसांनी जप्त (Liquor Seized In Nawapur) केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी स्वतः नाकेबंदीचा आढावा घेतला. latest news from Nandurbar, Nandurbar Crime,

जप्त करण्यात आलेल्या दारुविषयी बोलताना

गुजरात राज्यात दारूबंदी; महाराष्ट्रातून होते तस्करी -गुजरात राज्यात दारूबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होत असते. गुजरात राज्याच्या आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या नवापूर सीमा वरती भागात मोठ्या प्रमाणावर नाकेबंदी करण्यात आली आहे. येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक कसून चौकशी व वाहनाची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. या बंदोबस्ताच्या व नाकेबंदीचा आढावा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी घेतला.


निवडणुकीचा पार्श्वभूमीवर नाकाबंदी -गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात महाराष्ट्र आणि गुजरात पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून जाणाऱ्या वाहनांची गुजरात पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सीमावर्ती भागामध्ये मोठा पोलीस फौजफाटा घेऊन ग्रस्त घालताना दिसून येत आहे. नंदुरबार पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या पथकाने नवापूर शहरातील काहीची संशयितांची धरपकड केल्याची माहिती समोर आली आहे.


७० लाखाची दारू पोलिसांनी पकडली -गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाले. माहितीच्या आधारे गेल्या पंधरा दिवसांपासून सीमा वरती भागात मोठ्या प्रमाणावर नाकेबंदी करण्यात आली होती. यात वेगवेगळ्या कारवायात आतापर्यंत सत्तर लाखांची दारू पकडली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी दिली आहे.


पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन -नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याचा सीमावर्ती भागात आहे जिल्ह्याचे पाच तालुके गुजरात लागून आसल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने नाकाबंदी लावण्यात आले असून स्वतः पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक सीमा वरती भागात ग्रस्त घालत कोंबिंग ऑपरेशन ही राबवत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details