महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मतदार याद्यांचे विभाजन पूर्ण - नंदुरबार जिल्हाधिकारी

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबारसह राज्यातील चार जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मतदार यादी विभाजन करण्याचा आदेश काढले होते. यानुसार 30 ऑक्‍टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती.

जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मतदार याद्यांचे विभाजन पूर्ण

By

Published : Nov 1, 2019, 1:47 PM IST

नंदुरबार - प्रशासनाकडून जिल्हा परिषदेसाठी पार पडणाऱ्या निवडणुकीच्या तयारीचा वेग वाढवण्यात आला आहे. गट तसेच गणनिहाय मतदार याद्यांची विभाजन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच विभाजन केलेल्या मतदार याद्या निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबारसह राज्यातील चार जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मतदार यादी विभाजन करण्याचा आदेश काढले होते. यानुसार 30 ऑक्‍टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या अनुषंगाने विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 56 जिल्हा परिषद तसेच गट आणि 112 पंचायत समितींच्या आरक्षण याद्या काढण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे जिल्हा परिषदेसाठी आवश्यक असणारी पुरवणी मतदार यादी अंतिम करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details