नंदुरबार - आदिवासी दुर्गम जिल्ह्यात एका उच्च शिक्षित तरुणाने नोकरी सोडत आपल्या गावात येत वडिलोपार्जित शेती करण्यास सुरुवात केली. मात्र, या सोबत काही तरी नवीन करावे म्हणून त्यांनी अळंबी म्हणजेेच मशरूम शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात ते यशस्वी झाले. आता यातून त्यांना मोठा नफा झाला आहे.
घनश्याम पाटील यांचे शिक्षण बी. टेक. झाले आहे. शिक्षण झाल्यानंतर एका मोठ्या कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांनी नोकरी सोडून गावी शेती करण्याचा निर्णय घेतला. खालवलेली पाणीपातळी आणि कमी पाण्यात उत्पादन आधुनिक जोडधंदा सुरु करण्याचा निर्णय घेत ते मशरूम शेतीकडे वळाले. शेतात ८ हजार चौरस मीटर क्षेत्रावर शेड तयार करून त्यांनी अळंबी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.घनश्याम पाटील यांनी शेड मध्ये मशरूमसाठी लागणारे तापमान आणि आद्रता कायम ठेवली आहे. त्यांच्या युनिट मध्ये दर महिन्याला ३०० किलो ड्राय मशरूम उत्पन्न घेतात, ओला मशरूम २०० ते २५० रुपये किलो दराने विक्री होते. मात्र ड्राय मशरूमला ६०० ते ७०० रुपये दर मिळत असते तर पावडर ला ९०० रुपये दर मिळत असतो.