नंदुरबार - पुष्पदंतेश्वर साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेचे 36 कोटी रुपये कर्ज थकीत असल्यामुळे या कारखान्याचा लिलाव काढण्यात आला होता. लिलावात आस्ट्रेलिया अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खरेदी तो केला, त्यानंतर या कंपनीने आयन शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला तो विक्री केला आहे. कारखान्याचे संचालक सचिन शिंगारे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते.
पुष्पदंतेश्वर साखर कारखान्याच्या विक्री व्यवहाराची ईडीमार्फत चौकशी - ED inquires Pushpadanteshwar
कारखाना अगोदर आस्ट्रेलिया अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खरेदी केला, त्यानंतर या कंपनीने आयन शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला तो विक्री केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने या कारखान्याच्या चौकशीसाठी सर्व व्यवहारांची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
राज्य सहकारी बँकेचे कर्जामुळे कारखाना विक्री
राज्य सहकारी बँकेचे पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 36 कोटी रुपयाचे कर्ज थकीत असल्याने सहकारी बँकेने हा कारखाना लिलावात काढला होता. तो कारखाना अगोदर आस्ट्रेलिया अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खरेदी केला, त्यानंतर या कंपनीने आयन शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला तो विक्री केला आहे. पार्थ पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या सचिन शिंगारे आयन शुगरचे संचालक आहेत. आता ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने या कारखान्याच्या चौकशीसाठी सर्व व्यवहारांची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.