नंदूरबार - जिल्ह्यातील नवापूर शहर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरातील रंगावली नदीला मोठा पूर आला आहे. पावसामुळे पाण्याचा पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नागपूर-सुरत महामार्गावरील पूल पाण्याखाली जाण्यासाठी एक फुटाचे अंतर बाकी आहे. शहरातील इतर दोन पूल पाण्याखाली गेले आहेत.
नवापूर शहरातील रंगावली नदीला मोठा पूर - रंगावली नदी
महामार्गावरील पुलावर कोणतेही सुरक्षा उपाय करण्यात आलेले नाहीत. या पुलावरून वाहतूक सुरू आहे. नदीच्या सततच्या वाढणाऱ्या पाणीपातळी मुळे शहरातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.
नवापूर शहरातील रंगावली नदीला मोठा पूर
महामार्गावरील पुलावर कोणतेही सुरक्षा उपाय करण्यात आलेले नाहीत. या पुलावरून वाहतूक सुरू आहे. नदीच्या सततच्या वाढणाऱ्या पाणीपातळी मुळे शहरातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.