नंदुरबार : दिवाळीनिमित्त बाजारात विविध प्रकारच्या मातीच्या पणती, चिनी मातीची पणती त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या दिव्यांची विक्री सुरू झाली आहे. मात्र सध्या यंदाच्या दिवाळीला बाजारात सर्वाधिक मागणी आहे ती आदिवासी महिलांनी आपल्या हातानं गायीच्या शेणापासून तयार केलेल्या पणत्यांची. कशा प्रकारे गायीच्या शेणापासून पर्यावरणपूरक पणत्या तयार केल्या जातात व त्यातून आदिवासी महिलांना कशाप्रकारे रोजगार प्राप्त होत आहे यावर एक खास रिपोर्ट.
Diwali 2023 Special story : बचत गटाच्या माध्यमातून आदिवासी महिलेचा पर्यावरणपूरक व्यवसाय; गायीचा शेणापासून केली 'या' वस्तुंची निर्मिती - आदिवासी बहुल
नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्यामुळं महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे दुर्गम भागातील महिलांना प्रशिक्षण देऊन बचत गटाच्या मार्फत त्यांच्याकडून विविध वस्तूंची निर्मिती केली जात असते. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होतो व रोजगार उपलब्ध होत आहे.
Published : Nov 9, 2023, 12:25 PM IST
|Updated : Nov 9, 2023, 3:15 PM IST
आदिवासी महिलांना बचत गटामार्फत रोजगार :गायीच्या शेणापासून बनलेल्या पणती आणि धूपबत्तीला दिवाळीत मोठी मागणी आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून गावातील 44 महिलांना गायीच्या शेणापासून विविध प्रकारचे वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं. गायीचं शेण एकत्रित करत त्यात माती आणि इतर वस्तू मिसळून साचा आणि हाताच्या सहाय्याने विविध प्रकारचे पणती तयार केले जात आहे. कमी वेळेत आणि कमी खर्चात या सुंदर पणत्या तयार होतात. या सोबतच या आदिवासी महिला मेनापासून विविध प्रकारच्या आकर्षक मेणबत्या आणि दिवे, धूपबत्ती, हवन गोवऱ्या, धूप कांडी इतर अनेक वस्तू बनवून त्याची योग्य पद्धतीने पेकेजिंग करून विक्री करत आहेत. शेणापासून तयार केलेल्या पणती आणि इतर वस्तूंना बाजारपेठेत मोठी मागणी असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जास्त संख्येने पणत्या बनवण्याचे काम हे महिला करत असून या आदिवासी महिला आता चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
आर्थिक विकास विभागामार्फत महिलांना प्रशिक्षण :आदिवासी विकास विभागामार्फत आर्थिक विकास विभागातर्फे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिलं जात असतं. महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, या मुख्य उद्देशाने आदिवासी विकास विभाग प्रयत्न करीत आहेत. त्याच्यात एक भाग म्हणून दिवाळी सणानिमित्त गाईच्या शेणापासून पर्यावरणपूरक पणत्यांची निर्मिती करून बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील रोजगार अभावी अनेक आदिवासी कुटुंब हे आपल्या रोजगारासाठी गुजरात तसेच इतर राज्यात स्थलांतरित होत असतात. आदिवासी कुटुंबाचे स्थलांतरण थांबवण्यासाठी आपल्याच गावात प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात आली आहे.
हेही वाचा :