नंदुरबार- लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा पहिला अर्ज भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे भरण्यासाठी उमेदवार आले होते. परंतु, अर्ज भरण्याची शासकीय वेळ ३ वाजेपर्यंत असल्याने अर्ज भरणाऱ्यासाठी आलेल्या उमेदवाराला आणि कार्यकर्त्यांना माघारी जावे लागले.
मिरवणूक काढत उमेदवार आला अर्ज भरायला, कार्यालयाने पाठवले माघारी - लोकसभा
भारतीय ट्रायबल पार्टीचे उमेदवार अशोक दौलतसिंग पाडवी ३ वाजेनंतर अर्ज भरण्यासाठी आल्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.
भारतीय ट्रायबल पार्टीचे उमेदवार अशोक पाडवी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी २ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले आहे. गुरुवारी भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे अशोक दौलतसिंग पाडवी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचले. परंतु, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शासकीय वेळ ३ वाजेपर्यंत असते. भारतीय ट्रायबल पार्टीचे उमेदवार अशोक दौलतसिंग पाडवी ३ वाजेनंतर अर्ज भरण्यासाठी आल्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे अर्ज न भरताच त्यांना माघारी जावे लागले.