नंदुरबार- नंदुरबार हा आदिवासी बहूल जिल्हा आहे. येथील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि व्यसने या संदर्भात जाणीव जागृती व्हावी म्हणून नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी बालदिनाचे औचित्य साधत जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी सोशल मीडियाचा वापर करूण हा संवाद साधण्यात आला.
बालदिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी साधला संवाद - Children's Day Student Dialogue News Nandurbar
विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी व्यसनमुक्तीच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी काय करावे, तसेच सातपुड्यात असलेला विद्यार्थी हा काटक असतो. त्याने आपले खेळातील प्राविण्य दाखवत नवीन इतिहास घडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भारूड यांनी केले.
सोशल मीडियाचा वापर करूण जिल्हाधिकाऱ्यांचे भाषण एकताना विद्यार्थी
विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी व्यसनमुक्तीच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी काय करावे, तसेच सातपुड्यात असलेला विद्यार्थी हा काटक असतो. त्याने आपले खेळातील प्राविण्य दाखवत नवीन इतिहास घडवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भारूड यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी भारूड यांना विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांची भारूड यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
हेही वाचा-शहाद्यात घरात घुसली नाग-नागिनीची जोडी; थरार कॅमेऱ्यात कैद