नंदुरबार - आर.आर.(आबा) पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्कार 2019-2020 चे वितरण जिल्हा परिषद येथील याह मोगी सभागृहात पार पडला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांच्या हस्ते जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून सहा ग्रामपंचायती व त्यातून एक जिल्हास्तरीय ग्रामपंचायत निवड करून पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामपंचायतीने बाजी मारली.
विसरवाडी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय आर.आर.पाटील सुंदरगाव पुरस्कार-
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.(आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते स्व.आर.आर.(आबा) पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्कार 2019-2020 चे वितरण करण्यात आले. विसरवाडी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी विसरवाडी ग्रामपंचायत आहे. गावातील सर्व सुविधा व स्वच्छते हे निकष पाहून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकसहभागातून कामे केल्यास गाव सुंदर बनेल- सीमा वळवी
लोकसहभागातून चांगले कामे केल्यास सुंदर गावे निर्माण करता येतील. गावात स्वच्छता अभियान राबवून गाव सुंदर करण्याचा प्रयत्न करावा, असे जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांनी यावेळी सांगितले. विजेत्या गावांचा आदर्श घेऊन इतरही गावांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील अधिकाधिक गावे सुंदर करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावे.
विजेत्यांना सन्मानपत्र व बक्षीस
स्व.आर.आर.(आबा) पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्कार 2019-2020 चे वितरण प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींची निवड तालुकास्तरावर तर एक जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतींना तालुकास्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.
पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती