नंदुरबार - शहरात लॉकडाऊनदरम्यान अनेक सामाजिक संघटनांनी गरजूंना मदत करून सहकार्याची भूमिका दाखवली आहे. अशातच प्लॅन इंडिया, बार्कलेज, सी.वाय.डी.ए यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील २०० तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये 10 किलो तांदूळ, 10 किलो गव्हाचे पीठ, 2 किलो साखर, 2 किलो मीठ, बिस्कीट, चहा पावडर, स्वच्छता किट अशा वस्तू आहेत.
नंदुरबारमध्ये 200 तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - नंदुरबार न्यूज
प्लॅन इंडिया, बार्कलेज, सी.वाय.डी.ए यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील २०० तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये 10 किलो तांदूळ, 10 किलो गव्हाचे पीठ, 2 किलो साखर, 2 किलो मीठ, बिस्कीट, चहा पावडर, स्वच्छता किट अशा वस्तू आहेत.
ट्रांसजेंडर कम्युनिटी लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे नंदूरबारमध्ये वाटप
नंदुरबार नगरपरिषदेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. बाबुराव भिक्कड यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वाती शिरतर प्रकल्प व्यवस्थापक, ॲड. योगिनी खानविलकर प्रकल्प व्यवस्थापक, नवनिर्माण संस्थेचे रवी गोसावी, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. संस्थेने नंदुरबारच्या 100 गावांमध्ये अतिकुपोषीत कुटुंबाला 3 हजार जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटपाचे काम सुरू केले आहे.
Last Updated : Jun 22, 2020, 5:55 PM IST