नंदुरबार -स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका शेतात छापा टाकत बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील दलेलपूर नजिक ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या कारवाईत 81 हजार 30 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
नंदुरबारमध्ये बनावट मद्याचा कारखाना उद्ध्वस्त; ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त - स्थानिक गुन्हे शाखा कारवाई नंदुरबार
तळोदा तालुक्यातील दलेलपूर नजिक दारुचा बनावट कारखाना असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून यात बनावट दारुच्या 119 बाटल्या आणि यंत्र सामग्रीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -चकमकीवरून हैदराबाद पोलीस चौकशीच्या फेऱ्यात; मानवधिकार आयोगाची घटनास्थळाला भेट
तळोदा तालुक्यातील दलेलपूर नजिक दारूचा बनावट कारखाना असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून यात बनावट दारुच्या 119 बाटल्या आणि यंत्र सामग्रीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार अनिल गोसावी, हेड कॉ. योगेश सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.