महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रातील 'हा' अतिदुर्गम तालुका झाला कोरोनामुक्त; अत्यंत तोडक्या सुविधांमध्येही आरोग्य विभागाची कामगिरी - Dhadgaon taluka became corona free

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यात आतापर्यंत 862 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातून 22 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 840 जण पूर्णपणे बरे झाले आहे.

महाराष्ट्रातील 'हा' अतिदुर्गम तालुका झाला कोरोनामुक्त
महाराष्ट्रातील 'हा' अतिदुर्गम तालुका झाला कोरोनामुक्त

By

Published : Jun 19, 2021, 11:57 AM IST

Updated : Jun 19, 2021, 12:53 PM IST

नंदुरबार- जिल्ह्यातील आदिवासी बहुल व अतिदुर्गम असलेला धडगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जोरदार एन्ट्री केली होती. अतिदुर्गम भागात असलेल्या सातपुड्यातील धडगाव तालुक्यात पहिल्या लाटेत अत्यंत कमी रुग्णसंख्या होती. परंतु दुसऱ्या लाटेत धडगाव तालुक्‍यातील दुर्गम भागात ही कोरोनाची मोठी झळ पोहोचली. अत्यंत तोकडी आरोग्य व्यवस्था असतानाही विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात प्रथम धडगाव तालुका कोरोनामुक्त झाला आहे.

महाराष्ट्रातील 'हा' अतिदुर्गम तालुका झाला कोरोनामुक्त

धडगाव तालुक्यातील आकडेवारी
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यात आतापर्यंत 862 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातून 22 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 840 जण पूर्णपणे बरे झाले आहे. तालुक्यात सध्या एकही ॲक्टिव रूग्ण नसून तालुका पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे.

धडगाव तालुका प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजना
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव पाहता तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश वळवी यांच्या माध्यमातून सर्वप्रथम धडगाव बाजारपेठेत जनता कर्फ्यू लावण्यात आला. जनता कर्फ्यूच्या दरम्यान शहरात व गावांमध्ये वेळोवेळी सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर तालुक्यातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या १३ टीम व दोन मोबाईल व्हॅन अशा पंधरा पथकांद्वारे आरटीपीसीआर व रॅपिड अँन्टीजन चाचणीवर भर देण्यात आला. यात सर्वप्रथम बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यानंतरच बाजारपेठा सुरू करण्यात आल्या होत्या. दरम्यान ज्या व्यापार्‍यांनी चाचणी केली नव्हती त्यांना दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आलेली नव्हती. बाधित रुग्णांच्या उपचारासाठी धडगाव व मांडवी येथे कोवीड केअर सेंटरची निर्मिती करून योग्य उपचार देण्यात आले.

अलगीकरण पक्षाची निर्मिती
ग्रामपंचायत स्तरावर 10 अलगीकरण कक्ष तसेच वस्तीगृहांमध्ये अलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. प्राथमिक उपचारानंतर रुग्णांना घरी न पाठवता अलगीकरण कक्षात ठेवण्याची सोय करण्यात आली होती. एकूणच सातपुड्यातील धडगाव तालुक्यात अत्यंत तोकडी आरोग्यव्यवस्था असतानादेखील तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणीमुळे धडगाव तालुका कोरोनामुक्त झाला आहे.

Last Updated : Jun 19, 2021, 12:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details