महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदूरबारमध्ये जप्त केलेला लाखोंचा बनावट मद्यसाठा नष्ट - दारु न्यूज नदूरबार

अक्कलकुवा पोलिसांनी कारवाईतून जप्त केलेला अवैध बनावट मद्यसाठा नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार पोलिसांनी लाखो रुपयांचा अवैध बनावट मद्यसाठा नष्ट करुन विल्हेवाट लावण्यात आला आहे.

Destroyed confiscated counterfeit liquor in nandurbar
नंदूरबारमध्ये जप्त केलेला लाखोंचा बनावट मद्यसाठा नष्ट

By

Published : Jul 15, 2020, 3:34 PM IST

नंदूरबार -अक्कलकुवा पोलिसांनी कारवाईतून जप्त केलेला अवैध बनावट मद्यसाठा नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवीन धान्य गोदामाच्या परिसरात 37 गुन्ह्यांमधील लाखो रुपयांचा अवैध बनावट मद्यसाठा नष्ट करून विल्हेवाट लावण्यात आला आहे.

अक्कलकुवा पोलीस ठाण्याने विविध गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेल्या अवैध बनावट मद्यसाठ्याची शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवीन धान्य गोदामाच्या आवारात विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गणपत अहिरराव, न्यायालयाचे अधीक्षक विनायक पाडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील उपस्थित होते.

अक्कलकुवा पोलिसांनी विविध 37 गुन्ह्यांमध्ये पकडलेला लाखो रुपयांचा अवैध बनावट मद्यसाठा ताब्यात घेण्यात आला होता. या मद्यसाठ्याची विल्हेवाट लावण्याच्या आदेश अक्कलकुवा न्यायालयाकडून देण्यात आल्यामुळे येथील नवीनच बांधण्यात आलेल्या शासकीय धान्य गोदामच्या आवारात विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी खोक्रांमधील मद्याच्या बाटल्या खाली उतरून त्यावर रोलर फिरवून मद्यसाठा नष्ट करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details