नंदुरबार- रेल्वे प्रवासादरम्यान एकाच बर्थवर आई व लहान बाळाला प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दोन वर्षांपूर्वी नंदुरबार येथील एका दाम्पत्याने आपल्या लहान बालकाला घेऊन प्रवास कताना आईला मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या. त्यावर देवरे दाम्पत्याने संशोधन करत "बेबीबर्थ"ची संकल्पना निर्माण केली. कोरोना काळात दाम्पत्याने घरात बसूनच बेबीबर्थ स्ट्रक्चर तयार केले व त्यावर सर्व बाबींचा विचारपूर्वक अभ्यास करून दाम्पत्याने बेबीबर्थ तयार केले आहे.
माहिती देताना देवरे दाम्पत्य आई व बाळाचा प्रवास सुखकर होण्यासाठी तयार केलेले बेबी बर्थ
रेल्वे प्रवास करणाऱ्या महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. लांबचा प्रवास असला तर या महिलेची दमछाक होते. याच अडचणीतून महिलांची सुटका करण्यासाठी नंदूरबारच्या एका शिक्षक व त्यांच्या पत्नीने बाळांच्या सोयीसाठी भन्नाट संशोधन केले आहे. रेल्वेतील सध्याच्या लोवर बर्थमध्ये आई व बाळ दोघांना झोपण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नाही. त्यामुळे छोट्याशा जागेत अडखळत झोपावे लागते. तोकड्या जागेत आईसह बाळाला झोपता येत नसल्याने ते दोघांच्या आरोग्यासाठी हानिकरक आहे. नंदुरबार शहरातील भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षक नितीन देवरे व त्यांच्या पत्नी हर्षल देवरे यांनी रेल्वे प्रवास करताना आई व लहान बाळाला झोपण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी यासाठी फोल्डेबल बेबी बर्थचे संशोधन करून बेबी बर्थ तयार केला आहे. तेही अगदी कमी खर्चात तयार केलेल्या बेबी बर्थचा या दाम्पत्याने भारतीय रेल्वेला सादरीकरण करून अंमलात आणण्याची विनंती केली आहे. तसेच स्वतः संशोधन करून तयार केलेल्या बेबी बर्थवर स्वतःच्या पेटंटसाठी अर्ज देखील केला आहे.
अशी सुचली संकल्पना
दोन वर्षांपूर्वी एका प्रदर्शनासाठी नितीन देवरे हे परिवारासोबत एका ठिकाणी गेले होते. त्यांचे लहान बाळ असल्याने त्यांना रेल्वे प्रवासादरम्यान बाळाला झोपवण्यासाठी आलेल्या अडचणीनंतर टाळेबंदीदरम्यान त्यांनी रेल्वे प्रवास करताना बाळाला झोपवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण बेबी बर्थचे संशोधन सुरू केले होते. त्यात देवरे दाम्पत्यांना यश आले असून बेबीबर्थच्या निर्मितीनंतर भारतीय रेल्वेलाही त्यांनी सादरीकरण केले आहे. जवळपास पाचशे ते एक हजार रुपये दरम्यान खर्च असलेल्या बेबी बर्थच्या संशोधनावर स्वतःचे नाव कोरले जावे यासाठी शिक्षक नितीन देवरे व त्यांच्या पत्नी हर्षाली देवरे यांनी यासंबंधीचे संशोधन करीत पेटंट मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. (देवरेज फोल्डेबल बेबी बर्थ) या नावाने नुकतेच इंडियन पेटंट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
बेबी बर्थची वैशिष्ट्ये
- फोल्डेबल बेबी बर्थची लांबी व रुंदी हा 76 सेंटीमीटर बाय 23 सेंटीमीटर इतकी आहे.
- बेबी बर्थ 10 ते 12 किलोपर्यंत वजन पेलू शकतो.
- यामध्ये कंपोझीट लॉकिंग यंत्रणा वापरली गेली आहे.
- रेल्वेत सध्या अस्तित्वात असलेल्या लोअर बर्थमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही.
- झोपेत बाळ खाली पडू नये म्हणून संरक्षक बेल्टची सोय
- कमी वजनाचा व टिकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे.
- रेल्वेतील सध्या अस्तित्वात असलेल्या लोअर बर्थला हा फोल्डेबल बेबी बर्थ जोडला तर बाळ या बर्थवर झोपू शकते.
- अर्थातच लोअर बर्थ हा आईला झोपण्यासाठी पूर्णपणे मोकळा असेल.
- बर्थच्या खाली फोल्ड केल्यावर बसून प्रवासासाठी काहीही अडचण येत नाही.
- वृद्ध व्यक्तींना औषधी किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होईल.
- पॅसेंजर विशेषतः महिलांना हाताळण्यास सोपी अशी रचना.
- मजबूत व जास्त काळ टिकणारी जोडणी आणि हाताळताना विजेच्या वापराची गरज नाही ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.
हे ही वाचा -Nandurbar Accident : गाडीचा ब्रेक फेल होऊन अपघातात 17 प्रवाशी जखमी