नंदुरबार -नवापूर तालुक्यातील बंधारे शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नानगृहात पाय घसरून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. समीर सतीश गावित (वय ६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो पारकोटी येथील रहिवासी आहे.
शासकीय आश्रमशाळेत आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पाय घसरून मृत्यू - आश्रमशाळेत आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू
शाळेतील शिक्षकांनी जखमी समीरला चिंचपाडा येथील खासगी रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले होते. डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतू डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले.
हेही वाचा -नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात
शाळेतील शिक्षकांनी जखमी समीरला चिंचपाडा येथील खासगी रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले होते. डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतू डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. यासंदर्भात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बंधारे येथे पालकांनी मोठा आक्रोश व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. घटनास्थळी नवापूर पोलीस, आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी पालकांनी कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.