नंदुरबारमध्ये मृत अवस्थेत आढळला बिबट्या - वनविभाग
नंदुरबार : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता.
बिबट्याचा मृतदेह
नंदुरबार - शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. मात्र आज सकाळी प्रकाशा शिवारातील भरत दशरथ पाटील यांच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. मृत बिबट्याला पाहण्यासाठी यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.