महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तब्बल ३६ तासानंतर तापी नदीपात्रात सापडला युवकाचा मृतदेह - nandurbar

सोहेल सरफराज तेली (रा. गरीब नवाज कॉलनी, नंदुरबार) या युवकाने सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी घेतली होती. त्याचा मृतदेह ३६ तासांनंतर सापडला

सोहेल तेली

By

Published : Sep 12, 2019, 10:06 AM IST

नंदुरबार- सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी मारलेल्या युवकाचा मृतदेह तब्बल ३६ तासांनी प्रकाशा येथील तापी नदी पात्रात आढळून आला. सोहेल सरफराज तेली (रा. गरीब नवाज कॉलनी, नंदुरबार) या युवकाने सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी घेतली होती. तापी नदीचा प्रवाह वेगात असल्याने काही अंतरावर सोहेल तेली प्रत्यक्षदर्शींना दिसल्यानंतर गायब झाला होता.

हेही वाचा - धक्कादायक.. नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनावेळी एकाच कुटुंबातील सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू


ही बातमी कळताच नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळापासून प्रकाशा व लगतच्या गुजरात हद्दीतील नदीपात्रात त्याचा शोध घेतला. परंतु, तो मिळून आला नव्हता. त्यानंतर तब्बल ३६ तासानंतर बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सोहेल तेलीचा मृतदेह तापी नदी पात्रात आढळून आला. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात तेलीचे शवविच्छेदन करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details