नंदुरबार - आश्वासन देणारे नेते मंडळी निवडणुकीच्या फडात दंग आहेत. तर प्रशासन यंत्रणा आचारसंहिता आणि निवडणूक कार्यशाळेच कारण पुढे करण्यात मग्न आहे. त्यामुळे आठवडा भरापासून शहादा तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाला वेळ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आचारसंहितेमुळे रखडले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे हेही वाचा - नवापूर निवडणूक कार्यालयात आचारसंहितेबाबत उदासीनता
शहादा तालुक्यातील आसलोद परिसरात गेल्या आठवडा भरापासून पावसाने उसंत घेतली नसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकरवरील ऊस आडवा झाला आहे. तर इतर पिकाचेंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी अजून शेतकऱ्यांचा नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. आता तर आचारसंहिता लागल्याने महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी निवडणुकीच्या आड लपतील. त्यामुळे आम्हला कोण न्याय देणार? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - नंदुरबार: धरणातून सोडलेल्या पाण्याने नवापूर तालुक्यातील पिकाचे नुकसान