नंदुरबार - देशातील सर्वात मोठी मिरचीची बाजार पेठ असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत एक महिन्यानंतर लिलाव सुरू झाले आहेत. मिरची उत्पादत शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची विक्रीसाठी घेऊन आले होते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी आणि व्यापाऱ्यांची गर्दी झाली होती.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 'मिरची मार्केट'मध्ये उसळली गर्दी - Nandurbar Police
नंदुरबार जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्यामुळे नंदुरबार जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला आहे. 21 एप्रिलपर्यंत आहे असाच लॉकडाऊन ठेवावा असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले. मात्र, तरी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
राज्यात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मार्केट आणि बाजार समिती बंद होत्या. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्यामुळे नंदुरबार जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला आहे. 21 एप्रिलपर्यंत आहे असाच लॉकडाऊन ठेवावा असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले. मात्र, तरी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
नंदुरबार शहर पोलिसांनी या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग प्रमाणे वाहने लावण्यास सांगितले. बाजार समितीत जवळपास १ हजार क्विंटल पेक्षा अधिक लाल मिरचीची आवक झाली होती. शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत विक्रीसाठी आणल्यानंतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.