नंदुरबार- गुजरात राज्यातील उच्छल-निझर रस्त्यावरील गवाण गावाजवळ कार आणि डंम्परची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये शहादा तालुक्यातील अनरथ येथील 2 जणांचा मृत्यू झाला असून 2 बालक बचावले आहेत. अपघातात एकाच कुटुंबातील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांचे 2 पुत्र बचावले आहेत. जखमींना उच्छल येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गुजरातमध्ये कार आणि डंपरची समोरासमोर धडक हेही वाचा - एका रुपयात लग्न; शहाद्यात 26 जोडप्यांचा सामूदायिक विवाह
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी शहादा तालुक्यातील अनरथ येथील राजपूत परिवार गुजरात राज्यातील वापी येथून गावी परतत होते. त्यावेळी गवाण गावाजवळ डंम्परची आणि राजपूत यांच्या कारची (एम.एच.39 जे.1412) धडक झाली. यामध्ये योगेंद्रसिंग राजपूत आणि त्यांच्या पत्नी गायत्री राजपूत यांचा मृत्यू झाला आहे. तर निलमकुमार राजपूत आणि मयंककुमार राजपूत ही मुले जखमी झाली आहेत. योगेंद्रसिंग राजपूत हे गुजरात राज्यातील वापी येथे मॅकलोर्ड फार्मासिटी कंपनीत गुणवत्ता विभागात उपव्यवस्थापक म्हणून नोकरीला होते
या अपघाताची उच्छल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून डंपरचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - नवरंग रेल्वेगेट रस्त्यावर ट्रक उलटला; रस्ता दुरवस्थेने लोखंडी सळ्या ठरताहेत जीवघेण्या