नंदुरबार - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व.राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र पळाशी येथे केंद्र शासनाच्या कपास निगममार्फत सोमवारपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. 50 वाहनातून आलेल्या एक हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी करण्यात आली.
नंदुरबार : पळाशी केंद्रात शिल्लक कापूस खरेदीला सुरुवात.. - cotton sales start
नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्व.राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र आहे. याठिकाणी केंद्र शासनाच्या भारतीय कपास निगम (सीसीआय) मार्फत सन 2019-20 हंगामातील शिल्लक कापसाच्या खरेदीला सुरुवात झाली.
नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्व.राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र आहे. याठिकाणी केंद्र शासनाच्या भारतीय कपास निगम (सीसीआय) मार्फत सन 2019-20 हंगामातील शिल्लक कापसाच्या खरेदीचा शुभारंभ समितीचे सभापती किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संचालक डॉ.सयाजीराव मोरे, भरत पाटील, भारतीय कपास निगमचे केंद्रप्रमुख आदित्य वामन, पंकज झाडे, अशोक चौधरी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व सभापती किशोर पाटील यांनी सीसीआयच्या वरिष्ठ कार्यालयाच्या सातत्याने पाठपुरावा केल्याने कापूस खरेदी सुरू झाली आहे.
नंदुरबार तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून प्राप्त यादीनिहाय दररोज 50 कापूस विक्रेत्यांना बाजार समितीकडुन संपर्क केल्यानंतर कापूस विक्रीबाबत दोन दिवस अगोदरच तारीख देण्यात येत आहे. यासाठी 1200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी संबंधित कार्यालयाकडे कापूस खरेदीकरिता नोंदणी केली आहे. दररोज नियमाप्रमाणे 50 कापूस विक्रेत्यांचा कापूस विक्री होणार आहे. म्हणून शेतकर्यांनी शिल्लक असलेला कापूस स्वच्छ व कोरडा करून केंद्रावर विक्रीसाठी आणावा. सीसीआयमार्फत एफ.ए.क्यु.दर्जाचा कापूस खरेदी होणार असून काळसर, पिवळसर, कवडी कचरा मिश्रीत कापूस स्विकारला जाणार नाही, असे आवाहन सीसीआयचे केंद्र प्रभारी आदित्य वामन यांनी केले आहे.