नंदुरबार - संचारबंदी काळात जिल्हा प्रशासन आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, असे असताना शहादा येथे अत्यावश्यक सेवेत नसलेली आस्थापने उघडून व्यापार करणाऱ्यांना व विनाकारण फिरणार्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने पकडण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
माहिती देताना पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत हेही वाचा -'हे स्मशान कधी शांत होईल'? नंदुरबारकरांना पडलाय प्रश्न
पॉझिटिव्ह आल्यास विलगीकरण कक्षात, तर निगेटिव्ह आल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यानुसार वीस जणांना पोलिसांनी पकडून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
लॉकडाऊन काळात अनावश्यक सेवेतील व्यावसायिकांवर कारवाई
संचारबंदी काळात परवानगी नसणाऱ्या आस्थापनांना उघडणारे व्यावसायिक, शिवाय विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या अशा एकूण वीस जणांवर शहादा पोलिसांनी कारवाई करत कोरोना रॅपिड चाचणी केली. शहरात विनाकारण फिरणार्यांवर प्रथमच रॅपिड टेस्ट करण्याची कारवाई केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे, विनाकारण फिरणाऱ्यांवर पायबंद बसण्याची शक्यता आहे.
वीस जणांवर शहादा पोलिसांची कारवाई
संचारबंदी काळात परवानगी नसलेल्या आस्थापनांना सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांना पोलिसांनी विचारणा करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली. या व्यतिरिक्त दोंडाईचा रस्त्यावर शासकीय विश्रामगृह परिसरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या अनेक नागरिकांवर कारवाई केली. यात 20 जणांवर कारवाई केली, त्यात 18 पुरुष, दोन महिला आहेत. त्यांची कोरोना रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना मोहिदा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येईल, निगेटिव्ह आल्यास त्यांच्यावर पोलिसात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दिली.
पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना आव्हान
जिल्हा प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन काळात नियमानुसार अत्यावश्यक सेवेत असलेल्या आस्थापनांनाच परवानगी आहे. त्यांनीच दुकाने उघडी ठेवावीत. विनाकारण रस्त्यांवर काम नसताना फिरू नये. मास्क लावणे सक्तीचे आहे. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे. घरात राहणे अत्यंत सुरक्षित आहे. पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू नका, असे आवाहन शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी केले.
हेही वाचा -पालकमंत्री के.सी. पाडवी यांची जिल्हा रुग्णालयाला भेट