नंदुरबार - जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 204 बाधितांनी कोरोनावर मात केली असून 107 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 3 हजार 913 झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या ४ हजारांच्या घरात पोहोचली आहे. तर आतापर्यंत ९१ जणांचा बळी गेला आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी संसर्गमुक्तांची संख्या मात्र दिलासादायक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 2 हजार 770 बाधित संसर्गमुक्त झाले आहेत. दिवसभरात आलेल्या अहवालातून 204 बाधित संसर्गमुक्त तर 107 जणांना लागण झाली आहे.
नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील प्रिया पॅलेस 3, कल्याणी रेसीडेन्सी 1, सोनारगल्ली 1, अश्विनीपार्क 1, स्मित हॉस्पिटल1, जुना बैलबाजार 1, जळका बाजार 1, कोरीटनाका भागात 1, गोदावरी बिल्डींग 1, वाघेश्वरी कॉलनी 1, मोठा मारुती मंदिर 1, जुनी सिंधी कॉलनी 1, नंदुरबार तालुक्यातील विखरण येथे 1, शनिमांडळला 2, शहादा शहरातील तारामती नगरात 3, गुरुकुल सोसायटीत 1, मंगलमूर्तीत 1, श्रध्दा कॉलनी मलोणी येथे 1, साईबाबा नगरात 2, सप्तश्रृंगी कॉलनीत 1, मिरानगरात 5, मेनरोडला 1, शिवनेरी कॉलनीत 2, गांधी नगरात 1 रुग्ण आढळला.
शहादा तालुक्यातील मंदाणा येथे 2, सारंगखेड्यात 1, पाडळद्यात 1, तोरखेड्यात 2, म्हसावदला 3, लोणखेडा 2, पिंगाणे येथे 1, टेंभा येथे 1, जावदा येथे 2, बामखेडा येथे 1, सोनवदला 3, ब्राम्हणपुरीत 2, काकरदा खुर्दला 4, बिलाडीत 1, असलोदला 6, कहाटुळला 3, वडछीलला 1, फेस येथे 1, प्रकाशा येथे 1, तळोदा शहरातील शनिगल्लीत 1, राजकुल नगरात 1, पिपल्स बँकेजवळ 2, दत्त कॉलनीत 7, धडगांव येथील कृष्ण नगरात 1, नवापूर शहरातील लाईटबाजारात 1, पंचायत समितीत 3, स्वामी विवेकानंद चौकात 2, शास्त्री नगरात 1, कोविड केअर सेंटरमध्ये 1, नवापूर तालुक्यातील नवापाडा येथे 1, मोठे कडवान येथे 1, खांडबारा येथे 1, साक्री तालुक्यातील दुसाणे येथे 1, देशीरवाडे येथे 1, म्हसदी येथे 1, दोंडाईचा येथे 6, शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथे 1 अशा 107 जणांचा समावेश आहे. बाधितांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या शोध घेतला जात आहे. कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरण करण्यात आले आहे.