नंदुरबार - ट्रकचालक असल्याचा गैरसमजुतीने एकास तिघांनी मारहाण केली. मारहाण होत असतांना संबंधित जखमी आपला जीव वाचविण्यासाठी निम्स कोविड हॉस्पिटलमध्ये पळाला असता त्याचा पाठलाग करुन हॉस्पिटलमध्ये तिघा संशयित आरोपितांनी बेकायदेशीर प्रवेश करत कोविड रूग्णांना मारहाण करुन हॉस्पिटलच्या साहित्याची नासधुस केली. याप्रकरणी तिघांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरानजीक असलेल्या उड्डाणपुल बायपास रस्त्यावर आरडाओरड सुरु असल्याने उमेश गुलाबराव पाटील (रा.गोकुळधाम सोसायटी नंदुरबार) हे पाहण्यासाठी गेले असता संशयित आरोपीतांनी त्यांच्याविषयी ट्रकचालक असल्याचा गैरसमज करुन विनाकारण हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच उमेश पाटील यांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेले महेंद्र भास्कर देसले, रविंद्र जयचंद तमायचेकर, गोपाल किशोर पाटील, निलेश दगा मराठे, मयुर रविंद्र ठाकुर यांना शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली.