नंदुरबार- जिलह्यात नंदुरबार शहरा पाठोपाठ जिल्ह्यातील इतर ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 07 वर पोहोचली आहे. मध्यरात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्ट नुसार 03 जणाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात शहादा शहरातील दोन तर अक्कलकुवा येथील एकाचा समावेश आहे. शहादा आणि अक्कलकुवा येथे प्रशासनाच्या वतीने ज्या भागात कोरोना रुग्ण आढळून तो एक किलोमीटर भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
CORONA: चिंताजनक... नंदुरबारमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 7 वर - शहादा
नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 7 वर पोहोचल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. नंदुरबार शहरात ४,अक्कलकुवा मध्ये 1 तर शहादा येथे 2 रुग्ण आढळले आहेत.
नंदुरबार शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून त्याच्या कुटुंबातील व संपर्कातील नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यापैकी रुग्णाच्या कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात होती.
जिल्ह्यातील शहादा येथील 35 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष आणि अक्कलकुवा येथील 32 वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण रुग्ण 7
नंदुरबार 4
अक्कलकुवा 1
शहादा 2
नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि अफवावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.