नंदुरबार - एका शासकीय अधिकार्यासह दोघांना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. नंदुरबार येथील 48 वर्षीय अधिकारी, 51 वर्षीय पुरूष आणि रनाळ्यातील 35 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित आधिकारीच्या संपर्कातील 2 जण, पुरुषाच्या संपर्कातील 5 जण आणि महिलेच्या संपर्कातील 9 जण अशा एकूण 16 जणांना आरोग्य विभागाने क्वॉरंटाईन केले आहे.
रनाळ्यातील महिला ही मुंबईतील मुलुंड येथून आली होती. तर नंदुरबारमधील पुरुष हा नाशिक येथे उपचारासाठी गेला होता. प्रशासनाने बाधितांच्या वास्तव्याचा परिसर कन्टेंमेन्ट झोन करुन निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 वर पोहोचला असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला. तर 28 जण बरे होऊन घरी परतले असून 9 बाधित जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.