नंदुरबार - जिल्हा रुग्णालयातील एकलव्य कोविड कक्षात उपचार घेत असलेल्या 48 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याची पहिली वेळ असल्याने आरोग्य यंत्रणेचे पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी अभिनंदन केले. तर दुसरीकडे संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 10 जण पॉझिटिव्ह आल्याने चिंता पुन्हा वाढली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आणि पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत 48 रुग्णांना घरी सोडण्यात आले. याप्रसंगी आरोग्य कर्मचाऱ्यांसह पथके उपस्थित होते. जिल्ह्यातून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आनंद व्यक्त केला जात होता. तर दुसरीकडे दिवसभरात नंदुरबार जिल्ह्यात 10 कोरोनाबाधित आढळून आले आहेत.