नंदुरबार- संपूर्ण देशासह नवापूर तालुक्यातील खांडबारा येथेही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. अशात रस्त्यावर थुंकणार्या तीन जणांना पथकाने 200 रुपयांचा दंड ठोठावत त्यांच्यावर कारवाई केली आहे. याशिवाय गावातील तिघांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोरोना इफेक्ट : रस्त्यावर थुंकणार्या तिघांना ठोठावला दंड
संपूर्ण देशासह नवापूर तालुक्यातील खांडबारा येथेही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. अशात रस्त्यावर थुंकणार्या तीन जणांना पथकाने 200 रुपयांचा दंड ठोठावत त्यांच्यावर कारवाई केली आहे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून नियुक्त केलेले पथक सध्या शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. विनाकारण गर्दी करणार्या व मास्क न लावता फिरणार्यांवर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, आरोग्य अधिकारी डॉ.हरेश कोकणी यांनी रस्त्यावर थुंकणार्यास दंड दिला.
विसरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे व भूषण बैसाणे यांनी किराणा दुकानदारांची भेट घेत विशेष सूचना दिल्या. जास्त दराने माल विक्री केल्यास गुन्हे दाखल करुन दुकाने सील करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी सरपंच गुजराबाई गावित, शितल शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, किराणा दुकानदार, भाजीपाला व्यावसायिक, औषध विक्रेते आदी उपस्थित होते.