महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांचा दणका! लॉकडाऊन काळात नंदुरबार वाहतूक शाखेकडून 2,661 वाहने जप्त; साडेदहा लाखांचा दंड वसूल - vehicles seized

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने कडक कारवाई केली आहे. एप्रिल महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 2661 वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

vehicles seized by nandurbar transport branch
नंदुरबार वाहतुक पोलीस

By

Published : May 3, 2020, 5:17 PM IST

नंदुरबार - लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांच्या विरोधात कारवाईचे सत्र सुरूच ठेवण्यात आले आहे. या कारवाईत एप्रिल महिन्यात जिल्ह्यात तबब्ल 10 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 2661 वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या संदर्भात अद्याप निर्णय न झाल्याने वाहनधारकांना समोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

लॉकडाऊन काळात नंदुरबार वाहतूक शाखेकडून 2,661 वाहने जप्त

हेही वाचा...जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी DCP ची परवानगी आवश्यक, सरकारचा निर्णय

जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उचलला होता. या कारवाईत 2,661 वाहने जप्त करून त्यांच्याकडून सुमारे 10 लाख 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच अनेक वाहने अद्यापही वाहतूक शाखेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. शहर वाहतूक शाखेने जमा केलेल्या वाहनांच्या संदर्भात लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणी आता वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details