ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी आणि कामगार धोरणाचा विरोध करत काँग्रेसचे धरणे आंदोलन - Farmer bill news

केंद्र सरकारच्या कामगार आणि कृषी धोरणाच्या विरोधात आज नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.

Congress's agitation against farmers and labor bill
Congress's agitation against farmers and labor bill
author img

By

Published : Oct 2, 2020, 7:40 PM IST

नंदुरबार - केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेले कामगार आणि कृषी विधेयकाच्या विरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

नंदुरबारसह नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी व शहादा येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रत्येक तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी आणि कामगार विरोधी भूमिकेचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यासोबतच शहरातील हुतात्मा स्मारक उद्यान परिसरातही धरणे आंदोलन करण्यात आले.

उत्तर प्रदेशमधील हाथसर येथील घटनेचा आणि राहुल गांधी यांना पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी नवापूर मतदार संघाचे आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details