महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अडीच लाखाचे सागवानी लाकूड जप्त; शहादा वनविभागाची कारवाई - Confiscated teak wood in nandurbar

शहादा शहरातील गरीब नवाज वसाहतीत मुस्तकीन कामील तेली यांच्या मालकीच्या घराशेजारी ताडपत्रीत लपवलेले ८७ घनफूट सागवानी लाकूड वनविभागाने जप्त केले आहे. या लाकडाची किंमत २ लाख ६१ हजार रुपये आहे. वन विभागाने केलेल्या कारवाईने सागवानी लाकूड तस्करी करणार्‍यांवर जबर वचक बसला आहे.

नंदुरबार

By

Published : Nov 3, 2019, 3:24 PM IST

नंदुरबार - शहादा शहरातील गरीब नवाज वसाहतीत मुस्तकीन कामील तेली यांच्या मालकीच्या घराशेजारी ताडपत्रीत लपवलेले ८७ घनफूट सागवानी लाकूड वनविभागाने जप्त केले आहे. या लाकडाची किंमत २ लाख ६१ हजार रुपये आहे. वन विभागाने केलेल्या कारवाईने सागवानी लाकूड तस्करी करणार्‍यांवर जबर वचक बसला आहे.

शहादा उपविभाग नंदुरबार उपवनसंरक्षक एस.बी. केवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आर.एच.झगडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन शहादा वनक्षेत्रपाल अनिल पवार, जयनगर वनपाल आर.पी.विकार, मंदाना वनपाल एस.एस.देसले, वनरक्षक जे.यु. पवार, नईम मिर्झा यांनी ही कारवाई केली आहे.

वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी जप्त केलेला सर्व माल मुख्य डेपोत जमा केला आहे. सागवानाच्या ८७ घनफूट ५६ लाकडांची सरकारी किंमत पंच्याहत्तर हजार रुपये असल्याचे शहादा वनक्षेत्रपाल पवार यांनी म्हटले आहे. सागवान लाकूड जप्तीच्या कार्यवाहीने तस्करी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. जप्त केलेले सागवानी लाकूड हे सातपुड्यातील जंगलातून झाडे तोडून आणली आहे की, शेतकर्‍यांचे आहे, याविषयी तर्कवितर्क लावले जात असले तरी सागवानी लाकूड तोडणार्‍या आरोपींविरुद्ध कडक कारवाईचे संकेत सहवनसंरक्षक आर एच झगडे यांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details