महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये संचारबंदीचे उल्लंघन.. ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - corona curfew nandurbar

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून देशात आणि राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच रहाणे अपेक्षित आहे. नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

corona curfew nandurbar
बेजबाबदार नागरिकांना समज देताना पोलीस

By

Published : Mar 25, 2020, 11:51 AM IST

नंदुरबार- कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी देखील काही नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करताना आढळले. कायद्याची अवाज्ञा करणाऱ्या अशा ८ जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नंदुरबारमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून देशात आणि राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच रहाणे अपेक्षित आहे. नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, कोरोना विषाणूविरोधातील एकत्रित लढ्यात सहभागी होण्याएवजी काही नागरिक कायद्याचे उल्लंघन करत शहरात फिरताना दिसून आले. त्यामुळे अखेर कारवाईचा बडगा उचलला आहे.

दरम्यान, संचारबंदीमुळे शहरात येणारी सर्वच वाहतूक शहराबाहेर थांबविण्यात आली आहे. त्यामुळे, शहराबाहेर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा दिसून आल्या.

हेही वाचा-नंदुरबार जिल्ह्यात जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद; सर्व बसफेऱ्या रद्द, रेल्वे स्थानकावर शुकशुकाट

ABOUT THE AUTHOR

...view details