महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 30, 2019, 11:56 AM IST

ETV Bharat / state

वाल्हेरी धबधब्याखाली डोहात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

वाल्हेरी धबधब्यात मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी गेलेल्या नंदुरबार मधल्या महाविद्यालयीन युवकाचा बुडुन मृत्यू झाला. या घटनेची नोंद तळोदा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

वाल्हेरी धबधब्यात बुडुन महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू

नंदुरबार -तळोदा तालुक्यातील वाल्हेरी धबधब्यावर मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी गेलेल्या नंदुरबार येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तो नंदुरबार येथील जी.टी. पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेत तृतीय वर्षाचे शिक्षन घेत होता. मृत तरुणाचे नाव शुभम मनोहर शिंदे असे आहे.

महाविद्यालयाला रविवारची सुटी असल्याने दुपारी 1 च्या सुमारास मित्र शुभम वासुदेव पाटील, दिनेश लक्ष्मण वाघ, कुणाल माळी, कल्पेश भोजु पाटील, कल्पेश माळी, अविनाश गिरासे यांच्या सोबत तळोदा तालुक्यातील वाल्हेरी धबधब्यावर सुटी घालविण्यासाठी गेले होते. दुपारी पावणे दोनच्या सुमारास शुभम शिंदेने धबधब्यावरुन उडी मारली. तो खाली खोल डोहात गेला. काही वेळेनंतर शुभम शिंदे वर येत नसल्यामुळे त्याच्या सोबत उपस्थित असलेल्या मित्रांनी आरडाओरड केली. यावेळी पोलीस पाटील रविंद्र सुरत्या पाडवी व ग्रामस्थ त्याठिकाणी जमा झाले. घटनास्थळी पोहणार्‍यांनी धबधब्याच्या खोल डोहात उडी टाकुन शुभम शिंदे यास बाहेर काढले. शुभमच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शुभम शिंदेला पोहता येत नसल्यामुळे त्याच मृत्यू झाला.

सन 2013 मध्ये तळोद्यातील किराणा व्यापारी संघटनेची बैठक आयोजित केली होती. या बैठकीतील मोहसीमखाँ गुलाबखाँ पिंजारी आणि नितीन शांतीलाल कोचर हे दोघेही वाल्हेरीच्या धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. या दोघांचाही धबधब्याच्या डोहात बुडुन मृत्यू झाला होता. शुभम मनोहर शिंदे हा नंदुरबार तालुक्यातील भादवड येथील रहिवासी होता. तो जी.टी. पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. अचानक काळाने त्याच्यावर घाला घातला. शुभम शिंदेच्या परिवाराला दुःखद घटनेची वार्ता कळताच त्यांच्यावर एकच दुःखाचा डोंगर कोसळला. अविनाश गिरासे याच्या बातमीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, सुरेश इंद्रजित, नंदुरबार बाजार समितीचे माजी सभापती व्यंकट पाटील, के.आर. पाटील, संभाजी पाटील, मनोहर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details