नंदुरबार- शहादा पालिकेच्यावतीने स्वच्छता अभियानाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या शौचालय आणि ओला-सुका कचरा संकलनासाठी असलेल्या कचराकुंडीचे वाटप जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध विकासकामांचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.
नंदुरबार, शहादा पालिकेच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे लोकार्पण - कचराकुंडी
या कार्यक्रमात अपंग बांधवांसाठी असलेल्या पालिकेच्या ३ टक्के निधीतून दिव्यांग बंधूंना तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात अपंग बांधवांसाठी असलेल्या पालिकेच्या ३ टक्के निधीतून दिव्यांग बंधूंना तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच अपंग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांना तीन टक्के निधीतून धनादेशांचे वाटप करण्यात आले. पालिकेचा ३ टक्के निधी अपंग बांधवांसाठी खर्च करणारी शहादा ही नंदुरबार जिल्ह्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे.
पालिकेच्यावतीने स्वच्छ भारत अभियानासह राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांचे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशंसा केली आहे. तसेच यापुढेही विविध संस्था आणि कंपन्यांकडून सहायता निधी मिळवून नागरिकांसाठी विकासकामांना गती देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.